अमरावती- दि.१४:
समाज विखुरल्या गेला असून समाजाला संघटित महिलाच करू शकतात. त्या संघटित व्हाव्या त्याच सक्षमीकरण व्हावं या उदात्त हेतूने जिजाऊ, सावित्री, भिमाई, रमाई संयुक्त जयंती महोत्सव, स्त्री सन्मान सोहळ्याचे आयोजन असल्याचे प्रतिपादन युवा समाज प्रबोधनकार तथा मुख्य आयोजक सुजात गायकवाड यांनी केले.
माता भिमाई जयंतीच्या निमित्ताने जिजाऊ ,सावित्री, भिमाई, रमाई संयुक्त जयंती महोत्सव व स्त्री सन्मान सोहळा
संबोधी: डॉ बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन भीमटेकडी परिसर येथे शुक्रवार(ता.१४ फेब्रुवारी) रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. जयंती महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी तक्षशिला महाविद्यालय पाली विभाग प्रमुख प्रा डॉ रेखा पर्वतकर होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक विजया पंधरे अश्विनी गवई, अविका जामनिक, कुंदा सोनुले, गायिकाआशा मेश्राम, कांचन आडोळे,भारती गुळधे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नयन मोंढे,मयूर रविंद्र गायकवाड रोहिणी गवई , प्रिय शिरसाट , साक्षी चिंचखेडे , गुंजन मेश्राम, धम्मपिठावर विराजमान होते.
युवा प्रबोधनकार सुजात गायकवाड पुढे म्हणाले की, मुले घडविण्यासाठी प्रथम स्त्रियांना घडवावे लागेल कारण समाजातील युवक भरकटल्या गेला आहे. युवकांच्या हातात मोबाईल रुपी तलवार दिली आहे. तर महिला टीव्हीवरील सिरीयल मध्ये गुंतले आहेत. म्हणूनच धम्माची परिस्थिती बिकट होत आहे. समाजातील आपसी गट तट राजकारणामुळे बौद्ध विहार बंद पडले आहेत. श्रद्धावान उपासिका कमी प्रमाणात दिसतात, समाज आजही पोट जातीमध्ये विखुरला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांनाच धम्मदीक्षा दिली हे विसरायला नको, आज नाचणारा नव्हे तर वाचणारा समाज निर्माण करायचा आहे. स्त्रियांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. संघटित झाल्या तरच त्यांचे सक्षमीकरण होईल. सरकारने एकीकडे लाडकी बहीण योजना दिली. मात्र दुसरीकडे तुमच्या मुलांची स्वाधार योजनेचे पैसे अद्यापही देण्यात आले नाहीत त्यामुळे प्रस्थापितांना बळी पडू नका. संविधान व धम्म टिकविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. आज रात्रच नाही तर दिवसही वैऱ्याचा असल्याने सतर्क व सावधान राहण्याचे आवाहन सुजात गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानातून केले.
सोहळा तीन सत्रात पार पडला. प्रथम सत्र मध्ये सकाळी भिख्खू संघाच्या वतीने बुद्ध वंदना परित्राण पाठ पार पडला, द्वितीय सत्रात अविका अवधूत जामनिक प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन केले. जिजाऊ सावित्री व रमाई यांच्यावर आधारित वेशभूषा व नाटिका सादर करण्यात आल्या. तिसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला,सायंकाळी बक्षीस वितरण करण्यात आले.
महिलांचा कला गुणांना वाव मिळावा यासाठी त्यांना हक्काचं मंच मिळाव म्हणून विविध प्रकारच्या प्रबोधनात्मक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
स्त्री सन्मान सोहळा यशस्वी करण्याकरिता मुख्य आयोजक मयुर गायकवाड, विवेक वाकोडे, तेजस मनोहरे, भूषण राऊत, भावेश खेडकर, सुशील गवई, शुभम डामेकर , मंगेश नाईक सौरभ गायकवाड, प्रशिक संदीप नाईक , तेलमोरे, रविंद्र गायकवाड अजय शहारे संचालन अनुजा बनसोड , ऋतुजा आडोडे , पल्लवी खेडकर, प्रिय खेडकर, शैलेश मेश्राम यांनी सहकार्य केले. जयंती महोत्सव स्त्री सन्मान सोहळ्याला जिल्ह्यातील महिला उपासक संघाच्या उपासिका बहुसंख्येने उपस्थित होत्या.
