मुंबई-17 : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे काढता येत नसल्याचे समोर आले आहे. एसटी महामंडळाची परिस्थिती बिकटच असल्याची दिसत आहे.विशेष म्हणजे गेल्या महिन्यात एसटी महामंडळाने बस दरात 15 टक्के भाडेवाढ केली होती.. नव्या बस घेत असून महामंडळाच्या आर्थिक स्थितीकडे लक्ष केंद्रित करत ही भाडेवाढ महत्त्वाची असल्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं होते.असे असून देखील गेल्या ४ महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना पीएफ चे पैसे महामंडळाने भरले नसल्याचे समोर आले.एस टी महामंडळाची परिस्थिती अद्यापही बिकट असल्याचे दिसत आहे.ऑक्टोंबर महिन्यापासून एसटी महामंडळाने पीएफचे हप्ते भरले नसल्याने ज्या कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यातून पैसे काढायचे आहेत, त्यांना ते पैसेच काढता येत नसल्याचे समोर आले आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.महामंडळाकडे निधीचा तुटवडा असलयाने प्रॉव्हिडंट फंडासाठीचे हप्ते भरणे महामंडळाला जमले नाही.महामंडळाला मिळणारा निधी हा कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारावर खर्च करावा लागतोय असे एसटी महामंडळाचे अधिकारी सांगत आहेत.
